Showing posts with label 7th House. Show all posts
Showing posts with label 7th House. Show all posts

Tuesday, January 13, 2015

असफल लग्न

असफल लग्नाला अनेकदा शनी कारणीभूत असतो. जेव्हा ७ चा सब शनी असतो तेव्हा लग्नाच्या संबंधी काही ना काही वाईट घडत असते. लग्न खूप उशीरा ठरणे, लग्न मोडणे, घटस्फोट, जोडीदाराचा मृत्यू अशा गोष्टी घडतात.

एका पत्रिकेत ७ चा सब राहू होता तरी घटस्फोट झाला होता! अधिक खोलात गेल्यावर लक्षात आले की राहू वर शनीची तिसरी दृष्टी होती. म्हणजे इथे सुद्धा घटस्फोटाला शनीच कारणीभूत होता. (05-May-1955, 21:37 PM, Delhi, 28N36, 77E10)

7 चा सब 1/6/8/10 या भावांपैकीचा कार्येश असेल तर या भावांच्या कार्येश ग्रहाच्या दशा - अंतर्दशेत विवाह सौख्य बिघडते.

कायदेशीर घटस्फोटासाठी 7 चा सब 3 चा कार्येश असावा लागतो. तरच कायदेशीर घटस्फोट होतो. अन्यथा जोडपी नुसते विभक्त होतात व रागाचा भर कमी झाला की पुन्हा एकत्र येतात.

1 मुळे एकत्र कुटुंबात नजमणे. 6 मुळे शरीर सुखाची उणीव, 10 मुळे व्यावसायिक अहंपणा इर्षा, व 8 तीव्र मानसिक मतभेत ही कारणे समजतात.


(c) Copyright 2014, Shreerang Ketkar, All rights reserved.